सावरकर दाढी विरोधी होते, मग मुख्यमंत्री शिंदे दाढी काढून फिरणार?; संजय राऊतांची टीका

आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
सावरकर दाढी विरोधी होते, मग मुख्यमंत्री शिंदे दाढी काढून फिरणार?; संजय राऊतांची टीका

आज एकीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर, दुसरीकडे आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ठाण्यातील सावरकर गौरव यात्रेत आपला सहभाग नोंदवला. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करताना, "वीर सावरकर हे दाढीच्या विरोधात होते, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाढी काढून फिरणार का?" असा सवाल केला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "या मिंधे गटाला वीर सावरकरांबद्दल काय माहिती आहे? त्यांच्या साहित्याबद्दल काय माहिती आहे? वीर सावरकरांचा विचार आणि हिंदुत्त्व काय माहिती आहे?" असे सवाल त्यांनी केले. "मिंधे गटाच्या नेत्यांनी आधी वीर सावरकरांच्या साहित्याचे पारायण करावे आणि त्यानंतर यात्रा काढावी. भाजपनेही हेच करावे. हे लोक सावरकरवादी असूच शकत नाहीत" अशी टीका त्यांनी यावेळी केली. दरम्यान, "छ. संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची पूर्ण तयारी झाली असून आजची आमची सभा ऐतिहासीक होणार आहे," असा विश्वास संजय राऊत यांनी दर्शवला.

logo
marathi.freepressjournal.in