विरोधी पक्षनेता नसणे हे सरकारसाठी लाजिरवाणे - संजय राऊत

लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही बाब राज्य आणि केंद्र सरकारसाठी लाजिरवाणी आहे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी येथे केली.
विरोधी पक्षनेता नसणे हे सरकारसाठी लाजिरवाणे - संजय राऊत
Published on

मुंबई : लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही बाब राज्य आणि केंद्र सरकारसाठी लाजिरवाणी आहे. विरोधी पक्षाशिवाय तुम्ही दोन्ही सभागृह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी येथे केली.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून(सोमवार) सुरुवात होत आहे. विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही. या मुद्द्यावरून रविवारी राऊत यांनी सरकारला चांगलेच सुनावले.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून अनेक राज्यांत विरोधी पक्षनेता दिला गेला नाही. आता लोकसभेत राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे कारस्थान सुरू आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता होऊ नये म्हणून चक्क कायदे बदलले जात आहेत. लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे आणि त्याच लोकशाहीतील महत्त्वाचे पद नाकारायचे, हे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचे नाव दिले आहे. आता बरेच महिने झाले आहेत. पण ते नकोत, हे ठरवणारे तुम्ही कोण? विधान परिषदेतही विरोधी पक्षाला ते पद मिळू नये, यासाठी कारस्थाने केली जात आहेत.

महाराष्ट्राच्या ज्या मातीतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केले, त्या राज्यात लोकशाहीची अशी गळचेपी आणि हत्या होत केली जात आहे. यामागे विधानसभा अध्यक्ष आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी बसून पक्षांतराच्या बाबतीत खोटा आणि भंपक निर्णय देते, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? अशा विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, अशी भावनाही संजय राऊत यांनी व्यक्त केली.

पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आगामी राज्यसभेच्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. विरोधी पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक असल्याने महाराष्ट्रातील युतीच्या एकमेव जिंकण्यायोग्य जागेवर त्यांचा 'पहिला हक्क' आहे. पक्षाच्या भूमिकेत कोणतीही विसंगती नाही आणि त्यांनी निदर्शनास आणून दिले की सेना (ठाकरे) हा २० आमदारांसह विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. आदित्य ठाकरे यांनी जे म्हटले त्यात काहीही चूक नाही. आम्ही २० आमदारांसह सर्वात मोठा पक्ष आहोत. काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादीकडे (शप) कडे १० आहेत. जो कोणी राज्यसभेत निवडून येईल तो मविआचा उमेदवार म्हणून जाईल.

संजय राऊत, शिवसेना (ठाकरे) खासदार

logo
marathi.freepressjournal.in