संजय राऊतांची उपमुख्यमंत्री फडणवीसांना खुली ऑफर; म्हणाले, 'तर मी सकाळी सकाळी...'

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर दिली आहे
संजय राऊतांची उपमुख्यमंत्री फडणवीसांना खुली ऑफर; म्हणाले, 'तर मी सकाळी सकाळी...'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "संजय राऊतांचा भोंगा पहाटे पहाटे वाजत असतो. ते घाबरतात म्हणून रोज सकाळी त्यांची टीका सुरू असते," असे म्हणत संजय राऊतांना टोला लावला होता. त्यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही पलटवार केला. ते म्हणाले की, "मी तुमच्या सागर बंगल्यासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थाने बंद करा. मी सकाळी सकाळी बोलण्याचे बंद करतो, आहे का मंजूर?" अशी खुली ऑफर दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, "या देशात लोकशाही आहे, मला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. मी माझ्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, नेता आहे आणि सामना चा संपादकही आहे. त्यात त्यांना पोट दुखायचे कारण काय?" असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, "२०२४मध्ये नक्कीच देशात सत्ता परिवर्तन होणार आहे. भाजप विरोधामध्ये विरोधी पक्षांचे ईज्या कधीच होणार नाही, असा जो भ्रम आहे तो नक्कीच तुटून पडेल." असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे. तसेच, 'महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४० जागा जिंकू," असाही दावा त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in