Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट; काय म्हणाले संजय राऊत?

काल महाराष्ट्राचे (Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अहमदाबादमध्ये भेट झाली.
Sanjay Raut : महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट; काय म्हणाले संजय राऊत?
Published on

गेले काही महिने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद हा चांगलाच पेटला आहे. अशामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अहमदाबादमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट झाली. दोन्ही राज्यांतील सीमावाद सुरु असताना या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीच्या पद्धतीवर सवाल उपस्थित करत टीका केली आहे. "श्राद्ध उरकल्याप्रमाणे सीमा वादाचा प्रश्न दोन मिनिटात आटोपला" असा आरोप त्यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. दोन मुख्यमंत्री सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर रस्त्यात बोलतात. जाता-जाता, सहज भेटतात आणि बोलतात. या सीमाप्रश्नासाठी ५५-६० वर्षांपासून जे लोक लढत आहेत, शहीद होत आहेत, तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्यासारखं दोन मिनिटात आटोपता?" असा सवाल त्यांनी केला.

"कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला सातत्याने हल्ले करतायत, धक्के देत आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने चर्चा करत जनतेचा अपमान केला आहे, याचे गंभीर परिणाम होतील," असा इशारा संजय राऊत यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, "गाजलेला पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि गृहमंत्र्यांचा संपर्क जास्त होता. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृहमंत्रालयाच्या अधीन जातात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गृहमंत्रालय काम पाहते. त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्रीच असतात. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींऐवजी आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिले आहे.”

logo
marathi.freepressjournal.in