Sanjay Raut ; मी बाहेर असो किंवा नसो, २०२४पर्यंत मुख्यमंत्री माविआचाच: संजय राऊत

वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना दिला इशारा
sanjay raut
sanjay rautANI

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत म्हंटले की, " मी बाहेर असो किंवा नसो २०२४पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, यावेळी त्यांनी, "शिवसेनेचे रक्त एवढे स्वस्त नाही." असे म्हणत विरोधकांवरदेखील निशाणा साधला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटले की, "आमच्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहणार आहेत. असे असले तरीही २०२४पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल. मी तुरुंगाबाहेर असो किंवा हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. सत्ताधाऱ्यांनी पारदर्शकपणे कामे करायला हवीत. चुकीच्या कारवायांवर न्यायालयाचे हातोडे पडत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल. वारंवार खोट्या कारवाया होत राहणार आहेत. आम्ही अन्यायाविरोधात लढा देत त्यांना टक्कर देत राहू."

ठाण्यातील किसन नगरमध्ये झालेल्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादावर विचारले असता त्यांनी म्हंटले की, "शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकाचे रक्त सांडणार असेल तर, शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. शिवसैनिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे. ज्याने शिवसेनेचं रक्त सांडवण्याचा प्रयत्न केला ते राजकारणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यांचं फार काही चांगलं झालं नाही." असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in