Sanjay Raut : "पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे..."; काय म्हणाले खासदार संजय राऊत?

राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा असल्याचे मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले व्यक्त
Sanjay Raut : "पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे..."; काय म्हणाले खासदार संजय राऊत?

काल रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मोठी सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक बाबींवर आपले मत मांडले. यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले आहे. २०२४मध्ये उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत. पण, यावर आता भाकीत करणे सोपे नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले.

"२०२४च्या निवडणुकीमध्ये शिवसेना जास्त जागा जिंकणार असून राष्ट्रीय राजकारणात आमचा दबदबा कायम ठेऊ," असा विश्वास संजय राऊत यांनी दर्शवला. ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा महत्त्वाचा सहभाग आहे. कितीही संकटे आली की उद्धव ठाकरे लढत असतात. २०२४च्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. पण, २०२४मध्ये पंतप्रधान कोण होणार? यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

संजय राऊत म्हणाले की, "भारताच्या राजकारणामध्ये खऱ्या शिवसेनेने भूमिका बजावली आहे. संसदेत शिवसेनेच्या खासदारांच्या संख्येला महत्व असून अनेकदा शिवसेनेने हाती घेतलेले विषय राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे नेते एकाकी लढतात, आमचे नेतृत्वही काही कमी नाही. देशभरातील प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतात. तसेच, अनेक प्रमुख नेते मातोश्रीवर येऊन भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर संवाद साधतात. आम्ही सर्व एकत्र आलो तर पुढील लढाई सोपी जाणार आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in