संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; भाजप आमदारावर केले 'हे' गंभीर आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजप आमदारावर केला ५०० कोटी मनी लाँडरिंगचा आरोप
संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; भाजप आमदारावर केले 'हे' गंभीर आरोप

गेले काही दिवस भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. अशामध्ये अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. अशामध्ये आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल कुल हे पुण्यामधील दौंड विधानसभा मतदार संघाचे ते आमदार असून त्यांच्यावर ५०० कोटींच्या मनी लाँडरिंगचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राहुल कुल यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहेच, शिवाय भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "आतापर्यंत माझ्याकडे १७ कारखान्यांची प्रकरणे असून त्यामधील हे पहिले प्रकरण आहे. राज्यामध्ये काही विशिष्ट पक्षातील नेत्यांच्या मागे चौकशीचे सत्र लावता, मग तुमच्या सोबतच्या पक्षामधील लोकांच्या गैरव्यवहारावर कोण बोलणार? आता यावर सोमय्या गप्प का आहेत?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, "पाटसमधील भीमा सहकारी कारखान्याशी संबंधित शेतकरी किरीट सोमय्यांकडे गेल्यानंतर 'जर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांचे काही घोटाळे असतील तर सांगा मी ते प्रकरण ईडीपर्यंत घेऊन जाईन' असे उत्तर या शेतकऱ्यांना देतात," असा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणाले की, "माझे राहुल कुल यांच्याशी काही वैर नाही. हे प्रकरण माझ्या समोर आले म्हणून मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यासंबधी पत्र लिहिले. यासंदर्भात सर्व पुरावे आज उपमुख्यमंत्र्यांना मिळतील, मग ते काय करतात बघू. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नसून त्यांचे सरकार घटनाबाह्य आहे. मला उपमुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वास आहे. म्हणून मी त्यांना पत्र लिहल आहे,"

खासदार संजय राऊत यांनी पत्रामध्ये काय म्हंटले आहे?

खासदार संजय राऊत यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. "भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेला आहे, हे स्पष्ट दिसते. ५०० कोटीचा मनी लाँडरिंग व्यवहार असून या प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी, अशी आपल्याकडून अपेक्षा आहे."

त्यांनी म्हंटले आहे की, "भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पाठवत आहे. पीएमएलए कायद्याने कारवाई व्हावी, असे घोटाळे संचालक मंडळाने केले आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त लाभला असल्याने ते बिनधास्त आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीस सरकारी पाठींबा आहे का?" असा सवाल त्यांनी ट्विट करत विचारला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष भाजप आमदार राहुल कुल आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in