सीएमओवरील आरोप संजय राऊत यांच्या अंगलट येणार? मुंबई गुन्हे शाखेने बजावली नोटीस

याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने संजय राऊत यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितलं आहे
सीएमओवरील आरोप संजय राऊत यांच्या अंगलट येणार? मुंबई गुन्हे शाखेने बजावली नोटीस

शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे आपल्या निर्भीडपणासाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा ते अडचणीत देखील सापडतात. आता त्यांना मुख्यमंत्री कार्यालयावर केलेले आरोप अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी सीएमओवर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुन्हेगारांचा व्यवहार सुरु असल्याचं आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने संजय राऊत यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे नोंदवण्यास सांगितलं आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप केला होता. कारागृहात बंद असलेल्या गुन्हेगारांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला जात असल्याचा आरोप राऊत यांनी सीएमओवर केला होता. तसंच निवडणुकीपूर्वी धोकादायक गुन्हेगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय याप्रकरणाचे लवकरच पुरावे सादर करणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. आता राऊत यांनी नोटीस बजावून याप्रकरणी पुरावे सादर करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in