संजय राऊत यांचे आरोप गृह विभागाने फेटाळले

गृहविभागानुसार, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागांतर्गत काम करते आणि मुंबईसह एकूण ८ ठिकाणी डीएनए टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहे
संजय राऊत यांचे आरोप गृह विभागाने फेटाळले
Published on

प्रतिनिधी/मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे खा. संजय राऊत यांनी राज्यातील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेबाबत केलेले आरोप गृह विभागाने सपशेल फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप खोट्या माहितीच्या आधारे केला असल्याचा खुलासा गृहविभागाकडून करण्यात आला आहे. तर या प्रयोगशाळांमधून सर्व प्राधान्यशील आणि संवेदनशील प्रकरणांचे अहवाल नियमितपणे देण्यात येत असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट करण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित राज्यातील न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए तपासणी किट्स उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप केला होता. गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर पर्यायाने गृह विभाग सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; मात्र गृह विभागाने याबाबत खुलासा करीत राऊतांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

गृहविभागानुसार, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा ही गृह विभागांतर्गत काम करते आणि मुंबईसह एकूण ८ ठिकाणी डीएनए टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्रयोगशाळांमधून सर्व प्राधान्यशील आणि संवेदनशील प्रकरणांचे अहवाल नियमितपणे देण्यात येत आहेत. तर बुलढाणा येथे अलिकडेच एक अपघात झाला होता. त्यात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. यात अमरावती व नागपूर येथील प्रयोगशाळांमधून ८२ नमुन्यांचे डीएनए अहवाल हे ७४ तासांत देण्यात आले. तर नागपूर येथे सोलार एक्सप्लोझिव्हमध्ये झालेल्या १७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या दुर्घटनेत ९ कामगारांचे मृत्यू झाले होते. त्यात १०५ नमुन्यांचे डीएनए अहवाल हे तत्काळ देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in