रश्मी वहिनींनी संजय राऊतांना दिला होता प्रसाद; शिंदे गटाच्या या नेत्याने केला गौप्यस्फोट

पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांसह संजय राऊत यांनादेखील माहिती होती, असादेखील गौप्यस्फोट करण्यात आला
रश्मी वहिनींनी संजय राऊतांना दिला होता प्रसाद; शिंदे गटाच्या या नेत्याने केला गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रसाद दिला होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या गौप्यस्फोटानंतर, 'शरद पवारांप्रमाणे संजय राऊत यांनाही पहाटेच्या शपथविधीचा माहिती होती,' असादेखील गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, "पहाटेच्या शपथविधीबद्दल उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांना माहिती होती. परंतु त्यांना परिस्थितीमुळे काहीही बोलता आले नाही. मात्र त्यावेळी ज्या घटना घडल्या, त्या सर्व काही आता सांगू शकत नाही. पण संजय राऊतांना चांगलाच प्रसाद दिला होता. आता पश्चाताप करण्याची वेळ गेली आहे. तेही पुढे गेले आणि आम्ही देखील पुढे गेलो आहोत," असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला यावर नंतर बोलेन, पण याबाबत अख्ख्या मातोश्रीला माहिती आहे. ऑपरेटरपासून तर सर्व सचिव आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्यांपर्यंत सर्वांना माहित आहे. मात्र एवढ नक्की आहे की, ज्यांच्यावर विश्वास नको पाहिजे होता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला" असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in