सुषमा अंधारेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले, "तिने काय लफडी केली..."

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावर स्पष्टीकरणही दिले
सुषमा अंधारेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले, "तिने काय लफडी केली..."

एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर केली. ते यावेळी म्हणाले की, "ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. अब्दुल सत्तर, भुमरे सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहिती," असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत जोरदार टीका झाली. तसेच, सुषमा अंधारेंनी या विधानाबद्दल महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही म्हंटले होते.

यावर संजय शिरसाट स्पष्टीकरण देत म्हणाले की, "मी काय चुकीचे बोललो? ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारेंना माझ्या घरी बोलवून बहीण म्हणून साडीचोळी दिली आहे. आम्ही नाती जपणारी माणसं आहोत. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये 'संज्या', 'घोडा' असे म्हणता, ते तुमच्या संस्कृतीला शोभते का? तुम्हाला हा अधिकार दिला आहे का?," असा सवाल त्यांनी यावेळी केला. "माझ्यासाठी सत्ता महत्वाची नसून मी चुकीचे काहीही बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे." असे आव्हान त्यांनी केले आहे.

"महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखे बोलले पाहिजे. गुलाबराव पाटीलांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनादेखील शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशाप्रकारे शिव्या देण्याचे कंत्राट यांना कोणी दिले? महिला म्हणून आम्ही काहीच बोललोच नाही, पण त्याचा बाऊ करण्यात आला. यांची पार्श्वभूमी जर पहिली तर यांनी आत्तापर्यंत काय-काय विधाने केली याचे रेकॉर्डिंग आहेत." असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in