एकमेकांना भेटल्यावर संजय राऊत आणि संजय शिरसाट यांचा नमस्कार

एरव्ही एकमेकांवर आरोप करणारे संजय शिरसाट आणि संजय राऊत यांची वरळी सी लिंकवर झाली भेट
एकमेकांना भेटल्यावर संजय राऊत आणि संजय शिरसाट यांचा नमस्कार
Published on

अनेकदा माध्यमांसमोर शिंदे गटाचे नेते आणि ठाकरे गटाचे नेते हे एकमेकांवर टीका करताना दिसतात. विशेष करून शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत यांच्यावर आक्रमकपणे टीका करण्यात येते. यामध्ये शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे आघाडीवर असतात. मात्र, आज संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामध्ये वरळी सी लिंकवर भेट झाली. तेव्हा दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.

या भेटीवर संजय शिरसाट म्हणाले की, "संजय राऊतांसोबत वरळी सी लिंकवर भेट झाली. आमचे भांडण हे राजकारणातले आहे, आमचे वैयक्तिक भांडण नाही. संजय राऊत आणि सुनील प्रभू गाडीने येत होते. मीही येत असताना त्यांनी मला नमस्कार केला. मीही त्यांना नमस्कार केला. महत्त्वाचे म्हणजे आम्ही हसून नमस्कार केला. आमचे राजकीय मतभेद असले, तरीही आमची वैयक्तिक दुश्मनी नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in