आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट...

पुणे-पंढरपूर रोडवर आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांची प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी बातमी
आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट...

मान खटाव तालुक्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-पंढरपूर मार्गावरुन मलठण जवळून गाडी जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ५० फूट खड्यात जाऊन कोसळली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांना पुणे येथे रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या इतर ४ जणांवरही उपचार सुरु असून त्यातील दोघे गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉक्टरांनी माहिती दिली की, अपघातामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीच्या डाव्या बाजुला तसेच बरगड्यांना दुखापत झाली. अपघातामुळे ते काही काळ बेशुद्ध होते. मात्र, आता त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत असून काळजी करण्याचे काहीही कारण नाही. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. तर, सकाळी सहा वाजता त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर कपिल झिरपे त्यांच्यावर उपचार करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in