बारसु आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

रिफायनरीविरोधात बारसूमध्ये ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केले, यानंतर ३ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले
बारसु आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी बारसूमध्ये रिफायनरी विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. यानंतर ३ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत ट्विट करत माहिती दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटले की, "बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते." यांनतर मात्र चर्चांना उधाण एकीकडे आंदोलकांनी मातीपरीक्षण थांबवून चर्चेसाठी तयारी दाखवली आहे. तर, यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत की, माती परिक्षण होणार असून ५ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आहे." अशी माहिती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in