मरोळ येथे एसबीआयचे एटीएम जळून खाक

या घटनेचा स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी व पालिकेचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
मरोळ येथे एसबीआयचे एटीएम जळून खाक

मुंबई : अंधेरी पूर्व मरोळ येथील मुकुंद नगर को-ओपरेटिव्ह सोसायटी या इमारतीच्या खाली असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममध्ये सोमवारी दुपारी आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून एटीएम पूर्ण जळून खाक झाले. दरम्यान, या घटनेचा स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी व पालिकेचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

अंधेरी पूर्व अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, मरोळ पाईप लाईन मुकुंद नगर येथील तळ अधिक चार मजली मुकुंद नगर को-ओपरेटिव्ह सोसायटी या इमारतीच्या खाली असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये सोमवारी दुपारी १.१६ मिनिटांनी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून एटीएम मशीनसह आतील सामान जळून खाक झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in