यश ज्वेलरी कंपनीकडून स्टेट बॅकेत ४०५ केाटींचा घेाटाळा; मुख्य प्रवर्तकाचे मेाझांबिकला पलायन

यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि संचाल प्रमेाद गेायंका स्टेट बॅकेला ४०५.५८ केाटींना फसवणून आग्नेय आफ्रिकेतील मेाझांबिक देशात बेपत्ता झाले
यश ज्वेलरी कंपनीकडून स्टेट बॅकेत ४०५ केाटींचा घेाटाळा; मुख्य प्रवर्तकाचे मेाझांबिकला पलायन

(सेामेंद्र शर्मा)

सरकारी बॅंकांना गंडा धालून विदेशात पळून जाणाऱ्या उद्येाजकांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. अंधेरी येथील यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक आणि संचाल प्रमेाद गेायंका स्टेट बॅकेला ४०५.५८ केाटींना फसवणून आग्नेय आफ्रिकेतील मेाझांबिक देशात बेपत्ता झाले आहेत. सीबीआयने या प्रकरणी गुन्ह्याचा कट रचणे, फसवणूक करणे आणि गैरव्यवहार अशा कलमांखाली यश ज्वेलरी कंपनी आणि संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार सीबीआयने यश ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रमेाद गेायंका, आर ए टाटा, ए एल प्रभुदेसाई आणि अन्य अनेाळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांनी मिळून भारतीय स्टेट बॅकेची नरीमन पॅाइंट येथील शाखा आणि अलिकडेच स्टेट बॅकेत विलिन झालेली ई-स्टेट बॅंक ऑफ पटियाला या बॅकांच्या माध्यमातून हा घेाटाळा केला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार १२ एप्रिल रेाजी प्रकाश भारती नावाच्या एसबीआयच्या उप महाव्यवस्थापकाने कर्ज घेतलेली कंपनी आणि तिचे संचालक तसेच अनेाळखी सरकारी अधिकाऱ्यांनी मिळून बॅकेला फसवण्याचा कट रचल्याची तक्रार केली हेाती. त्यानंतर सीबीआयने पुढाकार घेउन फॅारेन्सिक ऑडीट करवून घेतले. त्यानुसार ३१.०३.२०११ ते ३१.०३.२०१४ या कालावधीतील व्यवहारांचे फॅारेन्सिक ऑडीट केल्यानंतर बॅकेला मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यात आलेल्या कर्जातून अपेक्षित संपत्ती खरेदी करण्यात आली नव्हती. उलट तेा पैसा अन्य कामासाठी पैसा वापरला गेल्याचे उघड झाले. कंपनीच्या संचालकांनी बेईमानी करुन बॅकेला ४०५.८५ केाटींना फसवले हे यातून स्पष्ट झाले कारण हे कर्ज बॅकेला अखेर बुडीत खाती जमा करावे लागले आहे.

दरम्यान यश ज्वेलरी कंपनीचे मुख्य प्रवर्तक प्रमेाद गेायंका यांच्या मुलाने ते हरवल्याची तक्रार २०१८ साली केली हेाती. तसेच वर्तमान पत्रांमध्ये छापली हेाती. सीबीआयने एफआयआर मध्ये गेायंका मापुटे मेाझांबिक येथून हरवले असल्याचे नमूद केले आहे. प्रमेाद गेायंकाचा भाउ विनेाद गेायंका याने यंदा फेब्रुवारी महिन्यात पेालीस कमिशनर विवेक फणसाळकर यांना फेान करुन आपल्या भावाचा शेाध लागला का याची चैाकशी केली हेाती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in