कामगार पुरवठ्याच्या कंत्राटात घोटाळा; निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

उपनगरीय रुग्णालयात बहुद्देशीय कामगार उपलब्ध करण्यासंदर्भात काढलेल्या ई-निविदेस चुकीच्या पद्धतीने कंत्राटदार नियुक्त करण्यात आले
Raosaheb Danve, MoS Railways
Raosaheb Danve, MoS Railways

मुंबई : उपनगरीय रुग्णालयात कंत्राटी कामगार भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मर्जीतील कंत्राटदाराला काम देण्याचा हा घोटाळा असून याबाबतचा कार्यादेश तातडीने रद्द करून संबंधित निविदा प्रक्रियाही रद्द करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

उपनगरीय रुग्णालयात बहुद्देशीय कामगार उपलब्ध करण्यासंदर्भात काढलेल्या ई-निविदेस चुकीच्या पद्धतीने कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन घोटाळा झाला असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. सदर निविदेमध्ये एकूण ५ निविदा सादर करणार्‍या कंत्राटदारांपैकी ४ कंत्राटदारांनी दर विश्लेषण हे परिशिष्ट ‘ब’ प्रमाणे सादर केलेली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in