त्या अफवाच... सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण

कौटुंबीक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये
त्या अफवाच... सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण
ANI

मुंबई पोलिसांकडून ३ ते १७ डिसेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, ही बातमी खोटी असल्याचे माहिती मुंबई शहरचे सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आल्याचे वृत्त चुकीचे आणि गैरसमज निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.
हे वृत्त चुकीचे असल्याचे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. “मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याची बातमी आहे. ही बातमी चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी आहे. मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलीस अॅक्ट ३७ (१) अन्वये जे लोकं बेकायदेशीर मोर्चे, निदर्शने काढतात, कायदा सुवस्थेस बाधा निर्माण करतात, त्यांच्या विरोधात आदेश दर १५ दिवसांनंतर काढण्यात येतो. वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३४१ दिवस हे आदेश जारी केलेले असतात. या आदेशांचा लोकांच्या सर्वसामान्य जिवनाशी अजिबात संबंध नसतो. यापूर्वीच कौटुंबीक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण करून घेऊ नये”, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in