ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील आरोपींची मालमत्ता जप्त

या आरोपींनी ड्रग्ज तस्करीतून मिळालेल्या पैशांतून मोठ्या प्रमाणात प्रॉपटी खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील आरोपींची मालमत्ता जप्त

मुंबई : ड्रग्ज तस्करीच्या पैशांतून प्रॉपटी खरेदी केलेल्या चार आरोपींना मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलने चांगलाच दणका दिला आहे. याच पैशांतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती बनविणार्‍या चार आरोपींची सुमारे तीन कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. ऑगस्ट महिन्यांत एमडी आणि चरस विक्री करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत नंतर पोलिसांनी १२ आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली होती. त्यात साहिल रमजान अली खान ऊर्फ मस्सा, मोहम्मद अजमल कासम शेख, शमशुद्दीन नियाजुद्दीन शहा, इम्रान अस्लम पठाण, मोहम्मद तौसिफ शौकतअली मंसुरी, मोहम्मद इस्माईल सलीम सिद्धीकी, सर्फराज शाबीरअली खान ऊर्फ गोल्डन, रईस अमीन कुरेशी, प्रियांका अशोक कारकौर, काएनात साहिल खान, सईद सज्जद शेख आणि अली जवाद जाफर मिर्झा यांचा समावेश होता. या आरोपींनी ड्रग्ज तस्करीतून मिळालेल्या पैशांतून मोठ्या प्रमाणात प्रॉपटी खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या प्रॉपटीची माहिती काढण्याचे काम गुन्हे शाखेकडून सुरू होते. ही माहिती काढल्यानंतर या सर्व प्रॉपटीवर आता पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in