गरजू लोकांकडून पैसे घेऊन बोगस शासकीय दस्तावेजाची विक्री

बनावट कागदपत्रांची विक्री होत असल्याचे आढळून आले
गरजू लोकांकडून पैसे घेऊन बोगस शासकीय दस्तावेजाची विक्री

मुंबई : गरजू लोकांकडून पैसे घेऊन त्यांना बोगस दस्तावेजाची विक्री करणाऱ्या एका त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गोवंडीतील दोन आधार केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून लॅपटॉप, संगणकासह मोठ्या प्रमाणात बोगस दस्तावेजाचा साठा जप्त केला आहे. मेहफुज अहमद खान, रेहान शहाआलम खान आणि अमन कृष्णा पांडे अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोवंडीतील काही आधार केंद्रावर बोगस शासकीय कागदपत्रे बनवून त्याची गरजू लोकांना विक्री केली जात असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर आधार केंद्रावर छापा टाकला असता, बनावट कागदपत्रांची विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in