ज्येष्ठ उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे निधन

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासहित आणखी तीन पुत्र असा परिवार आहे
ज्येष्ठ उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे निधन

शापूरजी पालनजी उद्योगसमूहाचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती पालनजी मिस्त्री यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. टाटा उद्योगसमूहात शापूरजी पालनजी समूहाचे १८.३७ टक्के समभाग आहेत. पालनजी मिस्त्री यांच्यामागे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासहित आणखी तीन पुत्र असा परिवार आहे.मिस्त्री यांनी रात्री झोपेत १ वाजण्याच्या सुमारास अंतिम श्वास घेतला. मिस्त्री यांनी आयरिश नागरिकत्व घेतले होते. मिस्त्री यांचा जन्म १९२९ मध्ये झाला. बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शापूरजी पालनजी उद्योगसमूहाला त्यांनी रिअल इस्टेट, वस्त्रोद्योग, शिपिंग व होम अप्लायन्स आदी क्षेत्रात आघाडीवर नेले. २९ अब्ज डॉलर्स मालमत्ता असलेल्या मिस्त्री यांना पद‌्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १८६५ मध्ये एसपी समूहाची स्थापना झाली. मुंबईत या समूहाने आरबीआय व एचएसबीसी या सुरेख इमारती उभारल्या. मिस्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मनसुख मांडाविया आदींनी शोक व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in