भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित घसरण

३०-शेअर बीएसई निर्देशांक मंगळवारी ३७.७० अंक किंवा ०.०७ टक्का घसरून ५७,१०७.५२वर बंद झाला
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित घसरण

सलग पाचव्या दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किंचित घसरण झाली. धातू, बँकिंग, वित्तीय कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा विक्रीचा मारा सुरू झाल्याने गुंतवणूकदार चिंतित आहेत.

दि ३०-शेअर बीएसई निर्देशांक मंगळवारी ३७.७० अंक किंवा ०.०७ टक्का घसरून ५७,१०७.५२वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८.९० टक्का किंवा ०.०५ टक्का घटून १७,००७.४०वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक २.२५ टक्के घसरला. त्यानंतर टायटन, एसबीआय, कोटक बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी व एचडीएफसी बँक यांच्या समभागातही घटझाली. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, इंडस‌्इंड बँक, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडिया यांच्या समभागात वाढ झाली. सेन्सेक्समधील १८ कंपन्यांच्या समभागात घसरण तर १२ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली.

आशियाई बाजारात टोकियो, सेऊलमध्ये वधारून बंद झाले. तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत संमिश्र व्यवहार सुरू होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.७८ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ८५.५६ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भारतीय भांडवली बाजारात ५,१०१.३० कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in