भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण

भारतीय चलन बाजारात गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी घसरुन ७९.५६ झाला.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, माहिती तंत्रज्ञान आणि बँकांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे सेन्सेक्स ७७० अंकांनी तर निफ्टी २१६ अंकांनी घसरला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी घसरुन ७९.५६ झाला.

दि बीएसई सेन्सेक्स ७७०.४८ अंक किंवा १.२९ टक्के घसरुन ५८,७६६.५९वर बंद झाला. दिवसभरात तो १०१४.५ अंकांनी घसरला होता. अशाच प्रकारे निफ्टीही २१६.५० अंकांनी घसरुन १७,५४२.८०वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस, सन फार्मा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात घसरण झाली. तर बजाज फिनसर्व, एशियन पेंटस‌्, भारती एअरटेल, टायटन, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा आणि इंडस‌्इंड बँकेच्या समभागात वाढ झाली. आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये आणि युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घट झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंटक्रूड २ टक्के घसरुन प्रति बॅरलचा दर ९३.७३ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी भांडवली बाजारातून ४,१६५.८६ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in