भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची उसळी; निफ्टीही १७,५००वर गेला

३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४६५.१४ अंक किंवा ०.८० टक्का वधारुन ५८,८५३.०७वर बंद झाला
भारतीय शेअर बाजारात  सेन्सेक्सची उसळी;  निफ्टीही १७,५००वर गेला

भारतीय शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स ४६५ अंकांनी उसळला. जागतिक बाजारातील सकारात्मक व्यवहार आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने बाजारात उत्साही वातावरण होते. निफ्टीही १७,५००वर गेला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४६५.१४ अंक किंवा ०.८० टक्का वधारुन ५८,८५३.०७वर बंद झाला. दिवसभरात तो ५४६.९७ अंक किंवा ०.९३ टक्का वाढून ५८,९३४.९० ही कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १२७.६० अंक किंवा ०.७३ टक्का वाढून १७,५२५.१०वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा समभाग सर्वाधिक ३.१३ टक्का वधारला. त्यानंतर बजाज फिनसर्व, एनटीपीसी, ॲक्सीस बँक, एचडीएफसी बँक, लार्सन ॲण्ड टुब्रो, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, इंडस‌्इंड बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात वाढ झाली. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले, विप्रो आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघाय, टोकियोमध्ये वाढ झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.६८ टक्का घसरुन ९४.३२ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून खरेदी सुरु असून शुक्रवारी त्यांनी १,६०५.८१ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in