सेन्सेक्सची घसरगुंडी सुरुच,१५७ अंकांनी कोसळला

दिवसभरात तो १,७७६.३६ किंवा ३.२७ टक्के घसरुन ५२,५२७.०८ ही किमान पातळी गाठली होती
सेन्सेक्सची घसरगुंडी सुरुच,१५७ अंकांनी कोसळला

आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांची सर्वाधिक विक्री झाली. दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स १४५६.७४ अंक किंवा २.६८ टक्के कोसळून ५२,८४६.७० वर बंद झाला. दिवसभरात तो १,७७६.३६ किंवा ३.२७ टक्के घसरुन ५२,५२७.०८ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४२७.४० अंक किंवा २.६४ टक्के घसरुन १५७७४.४० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, इंडस‌्इंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एनटीपीसी, इन्फोसिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स शुक्रवारी १,०१६.८४ अंक किंवा १.८४ टक्के घसरुन ५४,३०३.४४ वर बंद झाला होता. तर निफ्टी २७६.३० अंक किंवा १.६८ टक्के घटून १६,२०१.८० वर बंद झाला होता. आशियाई बाजारात सेऊल, टोकियो आणि शांघाय बाजारातही घसरण झाली. युरोपमधील बाजारातही दुपारच्या सत्रात विक्रीचा जोरदार मारा झाला.

तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १,५६८.४६ अंकांनी सेन्सेक्समध्ये घसरला होता. बीएसई - नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य गेल्या शुक्रवारी आणि सोमवारी झालेल्या घसरणीनंतर ९,७५,८८९.७७ कोटींनी कमी होऊन २,४५,१९,६७३.४४ कोटी रुपये झाले. निफ्टीतील बँक आणि वित्तीय निर्देशांक २.५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आयटी निर्देशांकमध्ये सुमारे ३ टक्क्यांनी, वाहन निर्देशांकमध्ये सुमारे २ टक्के आणि रियल्टी निर्देशांक २.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सलग १० व्या दिवशी शेअर ५.८५ टक्के घसरुन बीएसईवीर ६६८.२० तर एनएसईवर ६६६.९० रुपये झाला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.९८ टक्का घटून प्रति बॅरलचा भाव १२०.७५ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी ३,९७३.९५ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in