जागतिक मंदीच्या भीतीने सेन्सेक्स ४१२.९६ अंकांनी घसरला

गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स वधारून ६०,६७६.१२ पर्यंत पोहोचला.
जागतिक मंदीच्या भीतीने सेन्सेक्स ४१२.९६ अंकांनी घसरला

जागतिक मंदी येण्याच्या भीतीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१२.९६ अंकांनी घसरला तर निफ्टी १२६.३५ अंकांनी घसरून १७८७७.४० वर बंद झाला. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स वधारून ६०,६७६.१२ पर्यंत पोहोचला. वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली.

महिंद्रा, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सीस बँक व इंडस‌्इंड बँक आदींचे समभाग घसरले तर मारुती, पॉवरग्रीड, एनटीपीसी, एचडीएफसी, भारती-एअरटेल, लार्सन ॲण्ड टुब्रो, एसबीआयचे समभाग वधारले.

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, बाजार सुरू झाल्यानंतर जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांनी बाजार वधारला होता. मात्र, जागतिक बाजारात मंदीची चाहूल लागली आहे. त्यामुळे आयटी व फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्व क्षेत्राच्या समभागातून नफेखोरी झाल्याने बाजार घसरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in