१५६ अंकांनी सेन्सेक्स वधारला; दुसऱ्या दिवशीही बाजार सकारात्मक

लार्सन ॲण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज इन्फोसिस आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागात वाढ झाली.
१५६ अंकांनी सेन्सेक्स वधारला; दुसऱ्या दिवशीही बाजार सकारात्मक

जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स सुरूवातीला ५०० अंकांनी वाढला. त्यानंतर दिवसभरात १५६ अंकानी वाढून ५८,२२२.१०वर बंद झाला. निफ्टी ५७.५० अंकांच्या वाढीसह १७,३३१.८०वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग वधारले आहेत. दुसरीकडे १२ कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.

सेन्सेक्सवर्गवारीत टाटा स्टील, लार्सन ॲण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज इन्फोसिस आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागात वाढ झाली. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडस‌्इंड बँक, एचडीएफसी आणि आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली.

धातू, आयटी, रिअॅल्टी आणि ऑटो समभागांमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झाली. तेल आणि वायू, बँकिंग, फार्मा आणि वित्तीय समभागांमध्येही खरेदी झाली. बाजारात अदानी पॉवर आणि वेदांत समूहाच्या समभागांमध्ये प्रत्येकी पाच टक्क्यांनी वाढ झाली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक देखील १ टक्क्यापेक्षा जास्त आहेत. स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे ४०० अंकांनी वाढून २९,१००च्या पुढे पोहोचला आहे. एनएसई रियल्टी आणि मेटल्स २ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ऑटो आणि पीएसयू बॅंक निर्देशांक १ टक्क्यापेक्षा जास्त वाढले आहेत. दुसरीकडे, एनएसईचा एफएमसीजी निर्देशांक ०.४ टक्का घसरला आहे.

मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स १२७६ अंकांनी वदारुन ५८,०६५.४७वर बंद झाला होता. तर निफ्टी ३८६.९५ अंकांनी वाढून १७,२७४.३०वर बंद झाला होता.

दरम्यान, आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये वाढ तर शांघायमध्ये घसरण झाली. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.१४ टक्का वाढून ९३.५० अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी मुंबई शेअर बाजारात मंगळवारी १३४४.६३ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

logo
marathi.freepressjournal.in