चौथ्या दिवशीही सेन्सेक्स वधारला

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १४६.५९ अंकांच्या वाढीसह ५९,१०७.१९अंकांवर बंद झाला
चौथ्या दिवशीही सेन्सेक्स वधारला

आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली. रिलायन्स्ा इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी, एचडीएफसी बँक यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्याने बाजार वधारण्यास मदत झाली.

बुधवारी व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १४६.५९ अंकांच्या वाढीसह ५९,१०७.१९अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी २५.३० अंकांच्या किरकोळ वाढीसह १७,५१२.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकन बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक सकारात्मक उघडले. तर मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार बंद झाले. व्यवहाराच्या सुरुवातीला ३० शेअर्सचा सेन्सेक्स २३६.३६ अंकांनी वाढून ५९,१९६.९६ वर उघडला. त्याचवेळी ५० अंकांच्या निफ्टीनेही तेजीसह व्यवहाराला सुरुवात केली होती.

सेन्सेक्सवर्गवारीत नेस्ले, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या समभागात वाढ झाली. तर एनटीपीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डॉ. रेड्डीज, इन्फोसिस आणि मारुती यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघायमध्ये घसरण तर टोकियोमध्ये वाढ झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत संमिश्र व्यवहार होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७२ टक्का वाढून ९०.५४ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल दर झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारातून १५३.५० कोटींच्या समभागांची विक्री केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in