पंधरा लाखांचे दागिने पळविणाऱ्या नोकराला अटक

दागिने त्याच्या राहत्या गावी ठेवल्याचे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. वारंवार विचारणा करुनही तो हिरेजडीत सोन्याचे दागिने परत करत नव्हता
पंधरा लाखांचे दागिने पळविणाऱ्या नोकराला अटक

मुंबई : विश्‍वासाने दिलेल्या पंधरा लाखाांचे दागिने पळविणार्‍या एका नोकराला वनराई पोलिसांनी अटक केली. दिनेश देवराज गौडा असे या नोकराचे नाव असून, त्याच्याकडून अपहार केलेले सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. सुभाष जया सुवर्णा हे व्यवसायाने व्यावसायिक असून, ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत गोरेगाव परिसरात राहतात. त्यांची आई लिलावती या वृद्ध असल्याने तिची सेवा तसेच देखभाल करण्यासाठी त्यांनी दिनेश गौडा याला केअरटेकर म्हणून नोकरीस ठेवले होते. दिनेश हा त्यांच्याकडे जानेवारी २०२३ पासून काम करत होता. अनेकदा तिच्यासोबत तोदेखील त्यांच्या कर्नाटक येथील गावी जात होता. त्यामुळे त्याच्यावर सुभाष सुवर्णा यांचा विश्‍वास होता. त्यामुळे त्यांच्या आईच्या सर्व हिरेजडीत सोन्याच्या दागिने दिनेशकडे ठेवत होते. कुठल्या कार्यक्रमासाठी बाहेर जायचे असेल, तर तो त्यांना दागिने परत करत होता. १ जुलै २०२३ रोजी लिलावती यांचे निधन झाले होते. सर्व विधी संपल्यानंतर सुभाष सुवर्णा यांनी दिनेशकडे त्यांच्या आजीच्या हिरेजडीत दागिन्यांची मागणी केली होती. यावेळी त्याने ते दागिने त्याच्या राहत्या गावी ठेवल्याचे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. वारंवार विचारणा करुनही तो हिरेजडीत सोन्याचे दागिने परत करत नव्हता. नंतर तो नोकरी सोडून निघून गेला आणि त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. दिनेशने सुमारे पंधरा लाखांच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे लक्षात येताच त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in