चोरीनंतर पळून गेलेल्या नोकराला चोरीच्या मुद्देमालासह अटक

गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पळून गेलेल्या राजूला पोलिसांनी अटक केली.
चोरीनंतर पळून गेलेल्या नोकराला चोरीच्या मुद्देमालासह अटक

मुंबई : चोरीनंतर पळून गेलेल्या राजू बेंडू नाचरे या नोकराला चोरीच्या कॅशसहीत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. राजू हा मूळचा रत्नागिरीच्या खेडचा रहिवाशी असून, अटकेनंतर त्याला गावदेवी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ लाख ३४ हजार २२० रुपयांची कॅश पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तक्रारदार हिरे व्यापारी असून, ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत गावदेवी परिसरात राहतात. त्यांच्याकडे राजू नाचरे हा घरगडी म्हणून काम करत होता. ८ डिसेंबरला राजू हा कपाटातील सुमारे सहा लाखांची कॅश चोरी करून पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गावदेवी पोलिसांत राजूविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीचा गावदेवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पळून गेलेल्या राजूला पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in