मॉरिसच्या कटाची अमरेंद्रला कल्पना होती; अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाचे निरीक्षण

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नऱ्होनाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राचा जामीन अर्ज फेटाळणाऱ्या सत्र न्यायालयाच्या आदेशात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
मॉरिसच्या कटाची अमरेंद्रला कल्पना होती; अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी सत्र न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नऱ्होनाचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राचा जामीन अर्ज फेटाळणाऱ्या सत्र न्यायालयाच्या आदेशात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अभिषेकवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसच्या कटाची कल्पना अमरेंद्रला होती. दोघांनी मिळून पिस्तूलाच्या गोळ्या विकत घेतल्या होत्या. तसेच अमरेंद्रनेच मॉरिसकडे पिस्तूल सोपवले असावे, हे प्रथमदर्शनी पुराव्यांवरून स्पष्ट होते. याचा सखोल तपास गरजेचा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने अमरेंद्र मिश्राचा जामीन अर्ज फेटाळताना आपल्या आदेशात नोंदवले आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारीला फेसबुक लाइव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला गुन्हे शाखेने अटक केली. अटकेत असलेल्या अमरेंद्र मिश्रा याने ॲड. शंभू झा यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायाधीश राजेश ससाणे यांच्यासमोर सुनावणी झाली.

“अमरेंद्रला जामीनावर सोडल्यास सरकारी पक्षाच्या साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तो पुराव्यांमध्ये फेरफारही करू शकतो. तसेच मुंबईचा कायमस्वरूपी रहिवाशी नसल्यामुळे पळून जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आरोपीला जामीन देऊ शकत नाही,” असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in