सात दिवसांच्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप; ७५८ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन

गेल्या दोन वर्षांत कोरोनामळे प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते
सात दिवसांच्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप; ७५८ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन

घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विराजमान झालेल्या सात दिवसांच्या बाप्पासह गौरींचे ढोल-ताशाच्या गजरात आनंदाश्रूत निरोप देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरगुती ७१२ गणेशमूर्ती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील २० गणेशमूर्ती व २२ अशा एकूण ७५८ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान, समुद्रचौपट्यांवर, कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी झाली होती. दीड, पाच व सहा दिवसांच्या गणेश विसर्जनाप्रमाणेच मुंबईतील विसर्जनस्थळी गणेशभक्तांचा विशेषतः तरुण मंडळी, महिला आणि बच्चे कंपनी यांचा उत्साह दांडगा होता.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामळे प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले होते; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मंगळवारी सात दिवसांच्या गणरायाला सकाळपासून निरोप देण्याची लगबग बघायला मिळाली.

मुंबईतील जुहू, गिरगाव, दादर चौपाटी, शीतल, पवई, सायन तलाव आदी ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७३६ गणेशमूर्तींचे व २२ गौरींचेही विसर्जन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in