ग्रँटरोड येथील कुंटनखान्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मॅनेजरसह तिघांना अटक; सात महिलांची सुटका
ग्रँटरोड येथील कुंटनखान्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी एका मॅनेजरसह तिघांना पोलिसांनी अटक करून सात महिलांची सुटका केली. त्यात एका बांगलादेशी महिलेचा समावेश असून तिला दीड लाखांमध्ये विकून तिथे वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ग्रँटरोड येथील व्ही. पी. रोडवरील हाजी इस्माईल इमारतीमध्ये एक कुंटनखाना असून तिथे काही महिलांना जबदस्तीने डांबून वेश्यव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून शहानिशा केली. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच मंगळवारी एसीपी महेश देसाई, चंद्रकांत जाधव यांच्या विशेष पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी एका मॅनेजरसह दोन दलाल अशा तिघांना अटक केली. या तिघांविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांना सात महिला सापडल्या. त्यांच्या चौकशीत तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. या सर्व महिलांना नंतर मेडिकल चाचणी करून महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.

त्यातील एका बांगलादेशी महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर तिला या कुंटखान्यात दीड लाखांना विकण्यात आले होते. तिथेच तिला जबदस्तीने ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. ग्राहकांकडून मिळणारी रक्कम कुंटणखान्याचा मालक, चालक आणि दलाल घेत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in