ट्रॉम्बे-गोरेगाव येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ट्रॉम्बे आणि गोरेगाव परिसरात राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला.
ट्रॉम्बे-गोरेगाव येथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : ट्रॉम्बे आणि गोरेगाव परिसरात राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह एका वेश्यादलालास पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध भादंविसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सात तरुणीसह महिलांची सुटका करून त्यांना रवानगी महिला सुधारगृहात केली आहे. प्रियांका ही सेक्स रॅकेट चालवत असून, ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणांना विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवित असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने प्रियांकाला संपर्क साधला होता. ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी एक वाजता प्रियांका ही चार तरुणीसोबत तिथे आली होती. याच दरम्यान पोलिसांनी तिथे कारवाई करुन प्रियांकासह इतर चार बळीत तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर प्रियांकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली. दुसऱ्या कारवाईत बांगुरनगर पोलिसांनी कनिका नावाच्या एका ६२ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह दलाल नरेशकुमार बेचेन दांगी या दोघांना अटक केली, तर तीन तरुणींची सुटका केली. कनिका ही गोरेगाव परिसरात राहत असून, ती तिच्या राहत्या घरी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती.

logo
marathi.freepressjournal.in