किशोरवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैगिंक अत्याचार

पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच ४२ वर्षांच्या प्राध्यापकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे
 किशोरवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैगिंक अत्याचार
Published on

खासगी शिकवणीसाठी येणार्‍या एका किशोरवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच ४२ वर्षांच्या प्राध्यापकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत तरुणी ही १८ वर्षांची असून ती अंधेरी येथे तिच्या पालकांसोबत राहते. गेल्या दोन वर्षांपासून ती त्याच परिसरात खासगी शिकवणी घेणार्‍या आरोपी प्राध्यापकाकडे शिकवणीसाठी येत होती. आरोपी हा अंधेरीतील एका महाविद्यालयात फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवतो. फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शिकवणीसाठी येणार्‍या पिडीत मुलीवर त्याने लैगिंक अत्याचार केला होता. तिचे काही अश्‍लील व्हिडीओ काढले होते. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तिचा मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. हा प्रकार अलीकडेच या मुलीने तिच्या पालकांना सागितला होता. या माहितीनंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आरोपी प्राध्यापकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in