चुलत बहिणीचे लैंगिक शोषण; नराधमाला २० वर्षांची शिक्षा

वाकोला येथे आजोबांच्या उत्तरकार्यासाठी आत्याकडे आलेल्या आरोपी पिंटू गौड याने २६ मे २०१८ रोजी आत्याकडे राहणार्‍या काकाच्या मुलीचे लैंगिक शोषण केले.
चुलत बहिणीचे लैंगिक शोषण; नराधमाला २० वर्षांची शिक्षा

मुंबई : चार वर्षांच्या चुलत बहिणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या २७ वर्षीय नराधमाला विशेष पोक्सो न्यायालयाने चांगलाच दणका दिला. विशेष पोक्सो न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी आरोपी पिंटू गौड याला दोषी दोषी ठरवत २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि २५ हजाराचा दंड ठोठावला.

वाकोला येथे आजोबांच्या उत्तरकार्यासाठी आत्याकडे आलेल्या आरोपी पिंटू गौड याने २६ मे २०१८ रोजी आत्याकडे राहणार्‍या काकाच्या मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनतर खटला दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची विशेष पोक्सो न्यायाधीश एस. सी. जाधव यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील वीणा शेलार यांनी बाजू मांडताना पिडीत मुलगी तिच्या दोन वर्षांच्या भावंडासह आत्याकडे राहत होती. तिच्या आईचा आगीत मृत्यू झाल्यानंतर आत्याने पिडीत मुलगी व तिच्या भावंडाचा सांभाळ करण्याची जबाबदारी उचलली होती. याचदरम्यान आजोबांच्या उत्तरकार्यासाठी आत्याच्या घरी आलेल्या तरुणाने चुलत बहिणीचे लैंगिक शोषण करुन नात्याला काळीमा फासला याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना पिडीत मुलीसह आठ साक्षीदार तपासले. तसेच भक्कम वैद्यकीय पुरावे सादर केले. याची दखल घेत न्यायालयाने आरोपी पिंटू गौड याला दोषी ठरवत कलम ३०७ (अब) अन्वये २० वर्षांचा तुरुंगवास व २० हजारांचा दंड तसेच कलम ३७६ (२) (फ) अन्वये १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजारांचा दंड ठोठावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in