६४ वर्षांच्या वयोवृद्धेवर लैगिंक अत्याचार ;मानखुर्द येथील घटना

पीडित महिलेने नंतर घडलेला प्रकार ट्रॉम्बे पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत, अज्ञात व्यक्तीविरुद्ध मारहाणीसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला होता.
६४ वर्षांच्या वयोवृद्धेवर लैगिंक अत्याचार ;मानखुर्द येथील घटना

मुंबई : चेंबूर येथे राहणाऱ्या एका ६४ वर्षांच्या महिलेला बेदम मारहाण तसेच तिच्यावर रात्रभर वारंवार लैगिंक अत्याचार करून तिला विवस्त्र अवस्थेत घरातून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारहाणीसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंद होताच उमेश गुलाबराव ढोक या ३८ वर्षांच्या आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली.

उमेशविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद असून हा त्याचा दुसरा गुन्हा आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित वयोवृद्ध महिला चेंबूर येथे झाडूकामासह मासे विक्रीचे काम करते. सोमवारी रात्री ११ वाजता ती मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, शांतीनगर परिसरात असताना, तिला एका अज्ञात व्यक्तीने घरी सोडतो म्हणून स्वत:सोबत नेले. त्यानंतर तो तिला त्याच्या घरी घेऊन आला. तिथेच त्याने तिच्यावर रात्रभर वारंवार लैगिंक अत्याचार केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. तिच्या छातीवर, ओठावर आणि शरीराच्या इतर भागांवर जोरात चावा घेतला होता. तिला गंभीर दुखापत करून विवस्त्र करून पहाटे घरातून बाहेर काढून दिले.

पीडित महिलेने नंतर घडलेला प्रकार ट्रॉम्बे पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत, अज्ञात व्यक्तीविरुद्ध मारहाणीसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी उमेश ढोक याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यानेच या वयोवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in