नायरमधील लैंगिक छळ प्रकरण; राज्य महिला आयोगाची पालिकेला नोटीस, स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाने केलेल्या लैंगिक छळ प्रकरणातील कारवाईचा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई महापालिकेला नोटीस बजावत तत्काळ स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नायरमधील लैंगिक छळ प्रकरण; राज्य महिला आयोगाची पालिकेला नोटीस, स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश
File Image
Published on

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाने केलेल्या लैंगिक छळ प्रकरणातील कारवाईचा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई महापालिकेला नोटीस बजावत तत्काळ स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून केली आहे.

नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणी आपल्या स्तरावर केलेल्या कारवाईचा सद्यस्थिती अहवाल "महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ च्या कलम १२ (२) आणि (३) मधील तरतुदींनुसार तत्काळ सादर करावा," असे आयोगाने पालिका प्रशासनाला बजावलेल्या नोटीसीत नमूद केले आहे.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागण रईस शेख यांनी लावून धरली आहे. तसेच अधिष्ठाता यांनी आरोपींशी हातमिळवणी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in