पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शरद पवारांकडून कौतुक; मात्र संजय राऊतांची टीका

'नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आमची वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी आज ते जगात भारताची प्रतिमा जपण्याचे काम करत आहेत', अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींचे कौतुक केले आहे. मात्र त्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, 'आम्ही शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही', असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शरद पवारांकडून कौतुक;  मात्र संजय राऊतांची टीका
Published on

मुंबई : 'नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आमची वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी आज ते जगात भारताची प्रतिमा जपण्याचे काम करत आहेत', अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींचे कौतुक केले आहे. मात्र त्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, 'आम्ही शरद पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही', असे म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी असू शकते पण आज देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करताहेत हे विसरून चालणार नाही. यावर राऊत म्हणाले की, पवार यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. पंतप्रधानांनी प्रश्नांची उत्तरे दिलीच पाहिजेत. इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि नरसिंहराव हे परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते. शरद पवार तर सरकारमध्येसुद्धा होते त्यावेळी ते प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ देशांचादौरा केला. तिकडच्या पत्रकारांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर द्यायचे सोडून तुम्ही पळून का जात आहात ? नॉर्वेमधील पत्रकाराने प्रश्न विचारला आणि मोदी पळताना दिसले हे चित्र भारताच्या लोकशाहीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in