शिवसेना जेव्हा फुटली त्यामागे शरद पवार यांचा हात,केसरकरांचा गंभीर आरोप

शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते
शिवसेना जेव्हा फुटली त्यामागे शरद पवार यांचा हात,केसरकरांचा गंभीर आरोप

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. तर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनीच मदत केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तर शिवसेना सोडताना राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते, असे ते म्हणाले.

केसरकर म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in