मिसेस इंडिया क्वीन २०२२चे उपविजेतेपदी अबोली तेलवणे

३ जून रोजी सहारा स्टार, मुंबई येथे बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या उपस्थितीत पार पडली.
मिसेस इंडिया क्वीन २०२२चे उपविजेतेपदी अबोली तेलवणे
Published on

तेलवणे पॉवर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक अबोली तेलवणे यांनी मिसेस इंडिया क्वीन २०२२चे उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ३ जून रोजी सहारा स्टार, मुंबई येथे बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या उपस्थितीत पार पडली.

अबोली यांचा जन्म व पालनपोषण नागपूरमध्ये झाले आणि लग्नानंतर त्या मुंबईत आल्या. व्यवसायाने फार्मासिस्ट असलेल्या अबोली नऊ वर्षांपासून शिक्षकी पेशात होत्या. सध्या गेल्या नऊ वर्षांपासून त्या तेलवणे पॉवर इक्विपमेंट्सच्या ऑपरेशन्स विभागाच्या संचालक म्हणून काम करत आहेत. भारतभरातील आघाडीच्या २० स्पर्धकांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीपूर्वी दुबईमध्ये पाच दिवस सर्व स्पर्धकांना विस्तृत प्रशिक्षण व ग्रूमिंग सत्रांमधून जावे लागले. या स्पर्धेत टॅलेंट (प्रतिभा) फेरीचा समावेश होता. यामध्ये व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, चरित्र, विविध सोशल मीडिया टास्क व सामाजिक कार्यातील सहभाग आदी निकष होते.

logo
marathi.freepressjournal.in