इंद्राणी मुखर्जीला युरोपला जाण्यास परवानगी; ठेवल्या 'या' अटी

आपली मुलगी शीना बोरा हिची २०१२मध्ये हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली.
इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोरा यांचे संग्रहित छायाचित्र
इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोरा यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : आपली मुलगी शीना बोरा हिची २०१२मध्ये हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिला युरोपला जाण्यासाठी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली.

पुढील तीन महिन्यांमधील दहा दिवसांसाठी स्पेन आणि ब्रिटनला जाण्यास न्यायालयाने काही अटी व शर्तींवर तिला परवानगी दिली आहे.

या प्रवासात तिला भारतीय दूतावास किंवा राजनैतिक कार्यालयात जाऊन हजेरीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तिला दोन लाखांची सुरक्षा ठेव सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

१८ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही या अटीसह मुखर्जी यांची जामिनावर सुटका केली होती. मालमत्तेशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांसाठी इंद्राणीला युरोपला जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in