शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार 'दुर्गवीर' संस्थेला प्रदान

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे 'शिखर सावरकर' पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १५) राजभवन येथे देण्यात आले.
शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार 'दुर्गवीर' संस्थेला प्रदान
Published on

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे 'शिखर सावरकर' पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १५) राजभवन येथे देण्यात आले. यावेळी शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या 'दुर्गवीर' संस्थेला प्रदान करण्यात आला.

गिर्यारोहण हे साहसी तसेच संघटनात्मक कार्य असल्यामुळे सावरकर स्मारकातर्फे गिर्यारोहकांना २०२० पासून 'शिखर सावरकर' पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा 'शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार' ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या संस्थेला राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे व संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेश वराडकर व स्वप्नील सावरकर उपस्थित होते.

हरीश कपाडिया यांना 'शिखर सावरकर जीवन गौरव'

ज्येष्ठ गिर्यारोहक व हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते 'शिखर सावरकर जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना 'शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार' प्रदान करण्यात आला. हरीश कपाडिया यांनी हिमालय पर्वत शृंखलेच्या केलेल्या अध्ययनाचा गौरव करून राज्यपालांनी त्यांचे 'शिखर सावरकर जीवन गौरव' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

logo
marathi.freepressjournal.in