शिंदे सरकारचा मद्यपींना चांगलाच दणका

गोव्याला मौजमजेसाठी साठी जाऊन परत येत असताना अनेक मद्यप्रेमी हे छुप्या पद्धतीने दारूच्या बाटल्या राज्यात आणत असतात
शिंदे सरकारचा मद्यपींना चांगलाच दणका

शिंदे सरकारने मद्यपींना चांगलाच दणका दिला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक फतवा काढला असून जर गोव्यावरून विनापरवाना एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

गोव्याला मौजमजेसाठी साठी जाऊन परत येत असताना अनेक मद्यप्रेमी हे छुप्या पद्धतीने दारूच्या बाटल्या राज्यात आणत असतात. गोव्यात दारूवरील टॅक्स कमी असल्याने देखील राज्यात याची तस्करी केली जाते. यामुळे ही तस्करी थांबवण्यासाठी आता शिंदे सरकारने कठोर पावले उचलली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी एक फतवा काढला असून जर गोव्यावरून विनापरवाना एक देखील मद्याची बाटली आणल्यास त्यांच्यावर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देसाई यांनी दिल्या आहेत.

गोव्यावरून मोठ्या प्रमाणात स्वत: दारू आणून ती बेकायदेशीरपणे राज्यात विक्री केली जात होती. याचा परिणाम राज्याच्या महासुलावर होत होता. यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. काही नागरिक हे गोव्यातून मद्याच्या दुकानातून परवाना घेऊन राज्यात दारू घेऊन येत होते. मात्र, शंभूराज देसाई यांनी गोव्याला अशा प्रकारचा परवाना देण्याचा काहीही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. देसाई म्हणाले, यासंदर्भात आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला, तर मोक्का लावण्याचे आदेश देण्यात असल्याचे त्यांनी सांगतिले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असा परवाना देण्याचा त्यांना अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in