शिंदे गट १०० हून अधिक जागा लढवण्यावर ठाम? मुंबई पालिका निवडणूक

शिवसेनेची शकले झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी शिंदे गट अधिकाधिक जाग लढवण्यास आग्रही आहे. वेळप्रसंगी केवळ २-३ जागांवर माघार घेण्याची तयारी शिंदे गटाची असून १०० हून अधिक जागा लढवण्यावर शिंदे गट ठाम असल्याचे समजते.
शिंदे गट १०० हून अधिक जागा लढवण्यावर ठाम? मुंबई पालिका निवडणूक
Published on

मुंबई : शिवसेनेची शकले झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी शिंदे गट अधिकाधिक जाग लढवण्यास आग्रही आहे. वेळप्रसंगी केवळ २-३ जागांवर माघार घेण्याची तयारी शिंदे गटाची असून १०० हून अधिक जागा लढवण्यावर शिंदे गट ठाम असल्याचे समजते. दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती.

१०० पेक्षा कमी जागा लढवणार नाही

मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे पन्नास टक्क्यांहून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुतीतील शिंदे गटाला मोठे यश मिळू शकते. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे आम्ही १०७ जागांवर ठाम आहोत. परंतु, वेळप्रसंगी २-३ जागांसाठी आम्ही विचार करू. मात्र, १०० पेक्षा कमी जागा लढवणार नसल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शेवाळे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in