Dasra Melava : शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदे गटाला मोठा धक्का

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
Dasra Melava : शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदे गटाला मोठा धक्का

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देण्याची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र शिवसेनेच्या आणखी एका याचिकेवर न्यायालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी द्यायची की नाही याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण करणार? त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाने आपापल्या बाजू मांडल्या आहेत. दसरा मेळाव्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोट ठेवत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in