राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक; राज्यभर केली निदर्शने

पुण्यातील सारसबाग चौकात शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले
 राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक; राज्यभर केली निदर्शने

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, जालना, नागपूर आणि जळगाव येथे निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यातील सारसबाग चौकात शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. गेली अडीच वर्षे राऊत सातत्याने भाजपच्या चुकांवर टीका करत आहेत. याचाच राग भाजपला होता. त्यामुळेच कारवाई झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला, तसेच जो भाजपात प्रवेश करतो, तो धुतल्या तांदळासारखा होतो. भाजपविरोधात बोलल्यास ‘ईडी’ची कारवाई होते. संपूर्ण देशातील नागरिकांनी केवळ भाजपचाच झेंडा हातात घ्यायचा का, असा सवालही शिवसैनिकांनी केला. त्याचबरोबर नागपुरात शेकडो शिवसैनिकांनी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या दरम्यान, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ शिवसैनिकांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in