शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज आठवण येते - सुप्रिया सुळे

बाळासाहेबांनी ते स्वतः हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंना निवडले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज आठवण येते - सुप्रिया सुळे

आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ‘मुख्यमंत्री असावा तर, उद्धव ठाकरेंसारखा’ असे सांगितले. “आज आपल्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांची आठवण येत आहे. बाळासाहेबांनी माझ्यावर लहानपणापासून प्रेम केले. माँसाहेबांची संवेदनशीलता उद्धवजींच्या सगळ्या कृती आणि वागण्याबोलण्यातून दिसते,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“बाळासाहेबांनी ते स्वतः हयात असताना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंना निवडले. शिवसेनेची ही खूप मोठी जबाबदारी होती. त्यामुळे जर मुख्यमंत्री जर आवाहन करत असतील तर, हा खूप मोठा भावनिक क्षण आहे. राजकारणात यश अपयश, चढउतार येतच असतात. मात्र, शेवटी नाते आणि माणसांचा ओलावा हाच आयुष्यात शेवटपर्यंत टिकतो,” असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in