Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ठाकरेंचाच! मुंबई पालिकेकडून परवानगी मंजूर

आज (१२ ऑक्टोंबर) मुंबई महापालिकेने शिवतिर्थावर ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
Shiv Sena Dasara Melava 2023 : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ठाकरेंचाच! मुंबई पालिकेकडून परवानगी मंजूर

मुंबईतील दादारच्या शिवाजी पार्क(Shivaji park) मैदानावर दसरा मेळावा(Dasara Melava) घेण्यासाठी शिंदे विरुद्ध ठाकरे समोरासमोर ठाकले होते. यामध्ये काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवतिर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाचा(Shivsena UBT) मार्ग मोकळा झाला होता. शिंदे गटाने माघार घेतली असली तरीही मुंबई महापालिकेकडून(BMC) मात्र परवानगी बाकी होती. अखेर आज (१२ ऑक्टोंबर) मुंबई महापालिकेने शिवतिर्थावर ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या मैदानावरच दसरा मेळावा घेतला होता. बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा पुढे चालवली होती. पण दीड पर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे पक्षात सर्वात मोठा फूड पडली. यानंतर या मैदावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गेल्यावर्षी हे प्रकरण कोर्टात गेल्याने ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. यंदा देखील शिवसेनेचे दोन्ही गट शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा दावा करत होते. मात्र ऐनवेळी शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदावर मेळावा घेण्याचा दावा मागे घेतला. यानंतर ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला होता.

शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. यंदा शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदानावरील दावा सोडल्याने दक्षिण मुंबईत मैदानांची चाचपणी सुरु केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिल्याने उद्धव ठाकरे शिंदे गटासह बीजेपीवर काय तोफ डागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यंदा ठाकरे गटाकडून १ ऑगस्ट रोजी शिवाजी पार्कसाठी अर्ज दिला होता. त्यानंतर शिंगे गटाने ७ ऑगस्ट रोजी अर्ज दाखल केला होता. पालिकेने वेळेत परवानगी दिली नसती तर ही लढाई देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्याची तयारी ठाकरे गटाने केली होती. गेल्या वर्षी देखील ठाकरे गटाचाच दसरा मेळावा शिवतिर्थावर झाला होता. तर शिंदे गटाने बीकेसीच्या ग्राऊंडवर आपला दसरा मेळावा घेतला होता.

logo
marathi.freepressjournal.in