वसई-विरार महापालिकेविरोधात शिवसेनेचे उपोषण

तीन वर्षे पालिकेचा एकहाती कारभार पाहणारे आयुक्त आणि त्यांच्या प्रशासकीय टीम विरोधात तीव्र नाराजी व्यक्त झाली
वसई-विरार महापालिकेविरोधात शिवसेनेचे उपोषण

वसई : गेले आठवडाभर पाऊसाचे पाणी वसई विरार शहरात निचऱ्या अभावी साचून राहिल्यामुळे नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान पाचवावे लागून, तसेच प्रचंड त्रासाला समोरे जावे लागले आहे. गेले तीन वर्षे पालिकेचा एकहाती कारभार पाहणारे आयुक्त आणि त्यांच्या प्रशासकीय टीम विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, याचा निषेध म्हणून शिवसेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे येत्या बुधवार रोजी सकाळी १० वाजता विरार येथील पालिका मुख्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून नालेसफाई,नाले बांधणीचा भ्रष्टाचार या विषयांवर आयुक्त यांना पत्र लिहून,उपायुक्त चारुशीला पंडित यांना भेटून सर्व माहिती दिली होती. परंतु ना आयुक्त यांनी तक्रारींकडे लक्ष दिले ना उपायुक्त चारुशीला पंडित ह्यांनी गांभीर्याने दखल घेतली . पंडित या ९८.२० टक्के नालेसफाई केल्याचा फसवा दावा करीत राहिल्या. त्यावेळी सुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिले कि, नालेसफाई हि झालेली नाही. ती न झाल्यामुळे वसई विरार मध्ये पाणी साचेल, परंतु आपल्या तोऱ्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष दिले नाही, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in